रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाची धुव्वाधार बरसात सुरूच आहे. गुहागर वगळता सर्वच तालुक्यांमध्ये 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दापोली तालुक्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडू करण्यात आले आहे.
रत्नागिरीत मुसळधार! 24 तासात 153 मिमी पावसाची नोंद - guhagar
जिल्ह्यात पावसाची धुवांधार बरसात सुरूच आहे. गुहागर वगळता सर्वच तालुक्यांमध्ये 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दापोली तालुक्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडू करण्यात आले आहे.
मागील 24 तासात जिल्ह्यात 1382 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी 153.56 मिमी इतका पाऊस पडला आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, गेल्या 24 तासात दापोलीत 225 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मंडणगड आणि लांजा तालुक्यात 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेडमध्ये 165 मिमी, चिपळूण तालुक्यात 158 मिमी पाऊस पडला आहे. त्याखालोखाल राजापूरमध्ये 120 मिमी आणि रत्नागिरी तालुक्यात 113 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागर तालुक्यात 83 मिमी पावसाची नोंद झाली आहे.