रत्नागिरी - राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातही कोसळणाऱ्या पावसामुळे खेड मधील नारंगी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे खेड-दापोली महामार्ग पाण्याखाली गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे.
रत्नागिरीत मुसळधार; नारंगी नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प - खेड-दापोली मार्ग
या मुसळधार पावसामुळे खेड मधील नारंगी नदीला पूर आला आहे.
रत्नागिरीत मुसळधार पावसाने नारंगी नदीला आलेला पूर.(संग्रहीत)
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे खेड-दापोली मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर खेड शहरामध्ये सखल भागात पाणी शिरले आहे.