रत्नागिरी- जिल्ह्यातील खेड, चिपळूण, गुहागरला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वशिष्टी आणि खेडमधील जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बाजारपुल आणि पालशेत येथील बाजारपेठे जवळील पूल पाण्याखाली गेला आहे. तर मुसळधार पावसाने गुहागरमधील पालशेत बाजारपेठेत नदीचे पाणी घुसले आहे.
मुसळधार पावसाने खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड शहरात पाणी शिरू लागले आहे. जगबुडी नदीलगत असणाऱ्या खेडमधील मटण-मच्छी मार्केटचा संपर्क तुटला असून मार्केट लगतच्या सहा ते सात दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. नदीलगतचा रस्तादेखील पाण्याखाली गेला आहे.