रत्नागिरी- जिल्ह्यात रात्रभर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. खेड, गुहागर, चिपळूणमध्ये पावसाची रात्रभर संतधार सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी भरलं आहे, तर वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
चिपळूणमध्ये सखल भागात पाणी भरले -
रत्नागिरी- जिल्ह्यात रात्रभर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. खेड, गुहागर, चिपळूणमध्ये पावसाची रात्रभर संतधार सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी भरलं आहे, तर वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
चिपळूणमध्ये सखल भागात पाणी भरले -
गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण, गुहागर तालुक्यातील सखल भागात आज पुन्हा एकदा पाणी साचले असून, चिपळूण परिसरातील मच्छी मार्केट, जुना बाजार फुल, नाईक कंपनी या परिसरात पाणी भरले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास वाशिष्ठी नदी आणि शिवनदी धोक्याची पातळी ओलांडून शहराला पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने व्यापारी वर्गाची धास्ती कमी झाली आहे. मात्र दिवसभर जर पाऊस पडला तर चिपळूण शहरात पूरसदृश्य निर्माण होईल यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
खेड -दापोली- मंडणगड मार्गावरील वाहतूक विस्कळीत-
रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी आणि नारंगी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केट जवळ नारंगी नदीचे पाणी सुर्वे इंजिनियरिंग जवळ भरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र आज सकाळपासून पावसाची उघडीप असल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.