महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार कायम; 4 तालुक्यांमध्ये 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस

जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दक्षिण रत्नागिरीत सोमेश्वर, हरचेरी, चादेराई, उक्षी,हातीस, गावात पुराचे पाणी आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. तर,  ठीकठिकाणी घरे, झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार कायम

By

Published : Aug 5, 2019, 7:30 PM IST

रत्नागिरी -जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दक्षिण रत्नागिरीत सोमेश्वर, हरचेरी, चादेराई, उक्षी, हातीस, गावात पुराचे पाणी आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. तर, ठिकठिकाणी घरे, झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील 24 तासात 181 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात झाला सर्वाधिक 227 मिलिमीटर पाऊस झाला. तर, चिपळूण तालुक्यात 220 मिलिमीटर, लांजा तालुक्यात 209 मिलिमीटर, संगमेश्वर तालुक्यात 199 मिलिमीटर, मंडणगडमध्ये 190 मिलिमीटर पाऊस, राजापूरमध्ये 180 मिलिमीटर पाऊस, खेड तालुक्यात 165 मिलिमीटर , गुहागरमध्ये 132 मिलिमीटर पाऊस, दापोलीत 107 मिलिमीटर पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details