रत्नागिरी :मुंबई गोवा महामार्गावरील पहिला टोल नाका आजपासून सुरु झाला आहे. राजापूर येथील हातीवले टोल नाका आजपासून सुरु झाला आहे. सकाळपासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे. हातीवले ते कणकवली पर्यतच्या ७० किलोमिटरमधील अंतरासाठी हा टोल असणार आहे. ७० किलोमिटर पैकी ६९ किलोमिटरच्या चौपदरीकरणाचं काम पुर्ण झालं आहे. त्यापैकी ५५ किलोमिटरसाठी हा टोल असणार आहे. स्थानिकांसाठी ७० टक्केपर्यत सुट असणार आहे. महिन्याला ३३० रुपये भरून हा पास मासिकपास म्हणून स्थानिकांना वापता येणार आहे.
टोल वसुली सुरू : टोलबाबत बोलताना टोल वसुली कंत्राटदार यशवंत मांजरेकर म्हणाले की, यापूर्वी हा टोल सुरू झाला होता, मात्र स्थानिकांचा विरोध, पसरलेले गैरसमज यामुळे हा टोलनाका बंद झाला होता. पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जेव्हा रत्नागिरी दौरा झाला. तेव्हा गडकरी साहेबांनी सर्वांना क्लीअर केले की, जो रूट पूर्ण झाला आहे, त्याची आपण टोलवसुली करू शकतो. तसे आदेश एनएचएआयकडून आम्हाला प्राप्त झाले.