रत्नागिरी- फळांचा राजा अर्थात हापूस आंबा लॉकडाऊनच्या काळात सुद्धा थेट सातासमुद्रापार पोहोचला आहे. रत्नागिरी हापूस थेट इंग्लंडमध्ये गेला आहे. जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातल्यामुळे हापूसच्या निर्यातीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, परिस्थितीवर मात करत रत्नागिरी हापूस पुण्यातील विक्रेत्याकडून हैद्राबादमार्गे खासगी विमानाने इंग्लंडला पोहोचला आहे.
अडचणींवर मात करत 'रत्नागिरी हापूस' पोहोचला इंग्लंडमध्ये
इंग्लंडला 1 हजार 250 किलो हापूस पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 1 महिना उशिराने हा आंबा निर्यात झाला आहे. इंग्लंडमध्ये हापूसला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
इंग्लंडला 1 हजार 250 किलो हापूस पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 1 महिना उशिराने हा आंबा निर्यात झाला आहे. इंग्लंडमध्ये हापूसला मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाष्पजल किंवा उष्णजल प्रक्रियाकरुन हा आंबा पाठविण्यात येतो. आंबा इंग्लंडला जाण्यासाठी तेथील मराठी विक्रेते तेजस भोसले यांच्याशी येथील निर्यातदारांचा संपर्क सुरु होता. अखेर खासगी कार्गोने बुधवारी आंबा इंग्लंडमध्ये पोहोचला.
सध्या इंग्लंडमध्येही कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. मार्केट सुरु असल्यामुळे आंबा विक्री करणे शक्य असल्याचे तेथील व्यावसायिकांचे मत आहे. हापूसचा दर गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये 12 ते 13 युरो म्हणजे भारतीय चलनानुसार 950 ते 1100 रुपयांपर्यंत होता. यंदा तो 1350 ते 1400 रुपयांपर्यंत मिळेल, अशी अपेक्षा तेथील व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.