रत्नागिरी - जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली आहे. दापोली तालुक्यातील आडे गावातून सोमवारी संध्याकाळी ही हापूस पेटी रवाना झाली आहे. दापोलीतल्या अरुण लिमये यांच्या बागेतून ही पहिली आंबा पेटी वाशी मार्केटला पाठवण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना - News about Vashi Market
रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली. हा आंबा दापोली तालुक्यातील आडे गावातून सोमवारी संध्याकाळी रवाना झाला.
जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
लांबलेला पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर आहे. दरवर्षी साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आंब्याची पहिली पेटी जिल्ह्यातून जात असे. यावर्षी मात्र जानेवारीत आंब्याची पहिली पेटी दापोलीतून गेली आहे. चार डझनच्या आंबा पेटीला 10 ते 12 हजारांचा दर मिळण्याची शक्यता आहे.