महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिकारीला गेलेला युवक बंदुकीची गोळी लागून जागीच ठार - Ratnagiri Police News

रत्नागिरी जिल्ह्यात शिकारीला गेलेल्या तिन युवकांपैकी एका युवकाला बंदुकीची गोळी लागून ठार झाल्याची घटना देवघर येथील जंगलात घडली. या घटनेचा तपास गुहागर पोलीस करत आहेत.

gunman-who-went-to-the-forest-for-hunting-died-from-a-gunshot-wound
शिकारीला गेलेला युवक बंदुकीची गोळी लागून जागीच ठार

By

Published : Dec 8, 2019, 12:02 PM IST

रत्नागिरी - शिकारीला गेलेल्या तिने युवकांपैकी एका युवकाला बंदुकीची गोळी लागून तो जागीच ठार झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील देवघर येथील जंगलात घडली. सिद्धेश संतोष गुरव (वय 21, राहणार मार्गताम्हाणे) असे या युवकाचे नाव आहे. या घटनेने येथील परिसरात खळबळ माजली आहे.

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील काहीजण मित्र देवघर येथे शिकारी करता गेले होते. बुधवारी सायंकाळी चार ते सात या वेळेत शिकारीला गेलेल्या मधील सिद्धेश संतोष गुरव याला बंदुकीची गोळी लागून तो जागीच ठार झाला. या घडलेल्या घटनेची कोणालाच माहिती नव्हती. यादरम्यान गुहागर पोलिसांनाही उशिरा माहिती कळली. रात्री साडेआठ वाजता गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, उपनिरीक्षक ब्रह्मानंद कुमार जाधव, पोलीस सहकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे घटनास्थळी दाखल झाले.

शिकारीला गेलेला युवक बंदुकीची गोळी लागून जागीच ठार

या घटनेची पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी माहिती देताना, सिद्धेश संतोष गुरव याच्या डाव्या हाताच्या पंजातून गोळी आरपार जात तोंडाच्या डाव्या बाजूच्या जबड्यात घुसली. या मध्येच तो मृत झाल्याचे सांगितले. सिद्धेशच्या डाव्या हाता मध्येच 12 बोर ची सिंगल काडतूसाची बंदूक आढळून आली. या घटनेचा अधिक तपास करताना त्याच्याबरोबर मार्गताम्हाणे येतील आणखी दोन साथीदार गेल्याचे समजले. या दोघांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे तिघेही शिकारी करताच जंगलात गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात की घातपात हे अधिक तपासा मधूनच पुढे येणार आहे. गुहागर पोलिसांनी प्राथमिक नोंद अपघात म्हणून केली आहे..

ABOUT THE AUTHOR

...view details