रत्नागिरी -बारसु- सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकार हे जनतेच्या सोबत आहे. रोजगार मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. खेड तालुक्यातील तळे गावात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते.
Eknath Shinde: रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार हे जनतेसोबत; लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे- एकनाथ शिंदे
Eknath Shinde: राज्यातील युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देणे हेच सरकारचे उद्दिष्ट असून महाराष्ट्रात या सरकारच्या काळात नवनवीन उद्योग येतील, असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला: यावेळी मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देणे हेच सरकारचे उद्दिष्ट असून महाराष्ट्रात या सरकारच्या काळात नवनवीन उद्योग येतील, असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुंबई- गोवा महामार्गावर पनवेल ते सिंधुदुर्गपर्यंत हा महामार्ग ग्रीन फिल्ड अंतर्गत विकसित केला जाणार असून सागरी महामार्गाचे आवश्यक ठिकाणी रुंदीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
सरकार हे जनतेच्या सोबत:खासदार श्रीकांत शिंदे यांचे आजे सासरे विठू नाना कदम यांच्या उत्तरकार्य विधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेड तालुक्यातील तळे गावात आले होते. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम हे देखील उपस्थित होते. रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार हे जनतेच्या सोबत आहे. लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, ही सरकारची भूमिका राहणार आहे. असा विश्नास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.