रत्नागिरी - या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण गुरूवारी सकाळी पहायला मिळाले. देशाच्या काही भागातून कंकणाकृती आणि काही ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण दिसले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेतला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले कंकणाकृती सूर्यग्रहण - Ratnagiri Solar eclipse News
गुरूवारी अनेक ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्यात आले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेतला.
कंकणाकृती सूर्यग्रहण
हेही वाचा - सूर्यग्रहण अन् अंधश्रद्धा : कर्नाटकातील या गावात दिव्यांगाना पुरतात जमिनीत
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सूर्यग्रहणात जिवाणूंची वाढ कशी होते, याच्या अभ्यासाठी काही निरीक्षणे नोंदवण्यात आली. ग्रहणाविषयी लोकांच्या मनात असलेले समज, गैरसमज याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.