रत्नागिरी - गुहागर-चिपळूण मार्गावरील मालदोली गावाजवळ गोवा बनावटीची साडेसहा लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी एका आरोपीसह एक ओमनी ताब्यात घेतली आहे. उमेश आयरे, असे या आरोपीचे नाव आहे.
रत्नागिरीमध्ये साडेसहा लाखाची गोवा बनावट दारू जप्त; एक जण ताब्यात - राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग
याप्रकरणी पोलिसांनी साडेसहा लाखांची दारु जप्त केली असून उमेश आयरे या आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाला बनावट दारूची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गुहागर चिपळूण मार्गावर गणेश खिंड ते मालदोली रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली. यावेळी उत्पादन शुल्क विभागाला संशय आल्याने एका ओमनी गाडीची पाहणी केली. त्यावेळी गाडीतून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याचे समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी साडेसहा लाखांची दारु जप्त केली असून उमेश आयरे या आरोपीला अटक केली आहे.