रत्नागिरी-जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील "घरडा केमिकल्स" या केमिकल उत्पादक कंपनीत काल झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर दुर्घटनेतील पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले.
"घरडा" केमिकल्स कारखाना स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करणार; राज्यमंत्री आदिती तटकरेंची घोषणा - आदिती तटकरें लेटेस्ट न्यूज
या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे घरडा केमिकल्स तर्फे सांगण्यात आले असून जखमी कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.
"घरडा" केमिकल्स कारखाना स्फोट
Last Updated : Mar 21, 2021, 5:18 PM IST