महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुसळधार पावसाचा गणपतीपुळे देवस्थानाला फटका; संरक्षक भिंत कोसळली, प्रदक्षिणा मार्गही ठिकठिकाणी खचला

मुसळधार पावसाचा गणपतीपुळे देवस्थानाला फटका बसला. जोरदार पावसामुळे प्रदक्षिणा मार्गाची संरक्षण भिंत कोसळली सोबतच तलावाची संरक्षण भिंत कोसळल्याने देवस्थानाचे नुकसान झाले आहे.

गणपतीपुळे

By

Published : Jul 23, 2019, 2:39 PM IST

रत्नागिरी - राज्यात ठिकठिकाणी कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीचा फटका बसताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे देवस्थानालाही या अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला. सोमवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे देवस्थानातील संरक्षक भिंत कोसळली तर प्रदक्षिणा मार्गही मार्गही ठिकठिकाणी खचल्याने मंदीराचे खुप नुकसान झाले आहे.

गणपतीपुळे देवस्थानाची संरक्षक भिंत कोसळली


सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरश: झोडपुन काढले. रत्नागिरी तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाने चांगलीच बरसात केली. यात तब्बल २०० मिलिमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडला. या पावसाचा फटका गणपतीपुळे मंदिरालाही बसला आहे. जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणासाठी उभारण्यात आलेल्या प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळून प्रदक्षिणा मार्ग खचला आहे. तर तलावाचीही संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे देवस्थानचे मोठे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details