महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 20, 2019, 3:50 PM IST

ETV Bharat / state

रत्नागिरीतील मूर्तिशाळांमध्ये गणेशोत्सवाची लगबग, मूर्तिशाळांमध्ये बाप्पा सजले

कोकणात गौरी-गणपतीचा सण अगदी घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एकप्रकारचा व्यक्तिगत मनोभाव तयार झालेला आहे. त्यामुळे 4 महिने अगोदरच कोकणात या सणाची लगबग सुरू होते. आपल्याला मूर्ती यावर्षी कशी हवी आहे इथपासून ते मूतीशाळेत पाट देण्यापर्यंत लगबग असते.

जिल्ह्यातील मूर्तिशाळांमध्ये गणेशोत्सवाची लगबग

रत्नागिरी - कोकणी माणूस आणि विशेषतः चाकरमानी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी 2 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यातल्या सर्वच मूर्तिशाळांमध्ये लगबग वाढलेली दिसून येत आहे.

जिल्ह्यातील मूर्तिशाळांमध्ये गणेशोत्सवाची लगबग, मूर्तिशाळांमध्ये बाप्पा सजले

कोकणात गौरी-गणपतीचा सण अगदी घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एकप्रकारचा व्यक्तिगत मनोभाव तयार झालेला आहे. त्यामुळे 4 महिने अगोदरच कोकणात या सणाची लगबग सुरू होते. आपल्याला मूर्ती यावर्षी कशी हवी आहे इथपासून ते मूतीशाळेत पाट देण्यापर्यंत लगबग असते. हा गणेशोत्सव सण अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान त्यामुळे गुणेशमुर्तीशाळांमध्ये लगबग दिसू लागली आहे. विविध आकारातील सुबक गणेशमुर्ती घडवण्याची कामं सध्या सुरु आहे. अनेक गणेशमुर्ती शाळांमध्ये मूर्तिकाम जवळपास पूर्ण झालं आहे. जिल्ह्यात अनेक मूर्तिशाळांमध्ये प्रामुख्याने शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवल्या जातात. या शाडू मातीच्या मूर्तींना चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक मूर्ती असल्याने अनेकांची पसंती शाडू मातीच्या मूर्तींना असते. सध्या मूर्तीकाम झाले आहे, रंगकाम सुरू आहे.

परंपरेसाठी कोकणातल्या गणेशोत्सवाला आजही महत्व आहे. त्यामुळे किती फँन्सी आकारातल्या गणेशाच्या मुर्ती आल्या तरी कोकणी माणुस गणपतीच्या मुर्तींबाबतची आपली परंपरा काही सोडणार नाही. आजही पारंपारीक गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. त्यामुळेच गणेशमूर्ती शाळांमध्ये लालबागच्या राजाप्रमाणेच बालरुपातील, आसनावर बसलेला, वाघावर बसलेला, टिटवाळ्याच्या प्रतिकृती असलेला याच प्रमाणे उजवापाय पुढे असलेला, उजवा हातांनी आर्शिवाद देतानाच्या गणपती मूर्तींना कोकणात विशेष मागणी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details