महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ganesh Chaturthi 2022 रत्नागिरी जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन - Ganesh festival in Konkan

रत्नागिरी जिल्ह्यातही आज बाप्पांचं वाजत गाजत आगमन ( Bappa arrived in Ratnagiri district ) झालं आहे. कोकणात गौरी-गणपतीचा ( Gauri Ganpati festival in Konkan ) सण अगदी घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणतला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो.

Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022

By

Published : Aug 31, 2022, 4:15 PM IST

रत्नागिरी - बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा अखेर आज संंपली असून कोकणात आजचं वातावरण बाप्पामय झालं आहे. कोकणात ( Ganesh festival in Konkan ) सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. कोरोनाचे निर्बंध यावर्षी नसल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहाला उधाण आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही आज बाप्पांचं वाजत गाजत आगमन ( Bappa arrived in Ratnagiri district ) झालं आहे. कोकणात गौरी-गणपतीचा सण अगदी घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला ( Gauri Ganpati festival in Konkan ) जातो. कोकणतला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो.

ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन

हेही वाचा -Ganesh Chaturthi 2022: गोदावरीच्या राजाची मुंबईवारी; मनमाड कुर्ला एक्सप्रेस मध्ये गणरायाची स्थापना

बाप्पाचे आगमन

चाकरमानी जिल्ह्यासह कोकणात दाखल -प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एकप्रकारचा व्यक्तिगत मनोभाव तयार झालेला आहे. त्यातही कोकणातील या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असे की घराघरातून पुजल्या जाणाऱ्या गौरी-गणपतींचा ( Gauri Ganpati ) थाट मात्र सार्वजनिक उत्सवांसारखाच असतो. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात कोकणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने लाखोंच्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यासह कोकणात दाखल झाले आहेत. आज गावागावात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकी काढत गणरायाला आपल्या घरी आणण्यात आलं.

१०९ सार्वजनिक गणेशोत्सव -रत्नागिरी जिल्हयामध्ये १ लाख ६७ हजार ८४४ घरगुती गणपती तर, १०९ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामधील ११ हजार ९८४ दीड दीवसांचे गणपती आहेत. गौरी गणपतीपर्यंत १ लाख ३४ हजार१०३ घरगुती गणपती तर अनंत चतुर्दशीपर्यंत २१ हजार ७५७ घरगुती व १०९ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार आहेत.

हेही वाचा -Ganesh Chaturthi 2022: प्रतिष्ठेसोबतच वादाची परंपरा कायम, लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी राडा

ABOUT THE AUTHOR

...view details