रत्नागिरी-कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी गांधीधाम- तिरुनेलवेली फेस्टीव्हल स्पेशल रेल्वेच्या फेरीत वाढ करण्यात आली आहे. वाढीव फेऱ्यांनुसार ही रेल्वे आता २९ एपिलपर्यंत धावणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती लक्षात घेत विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
गांधीधाम- तिरुनेलवेली फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे २९ एपिलपर्यंत धावणार - गांधीधाम- तिरुनेलवेली फेस्टीव्हल स्पेशल रेल्वे बातमी
कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या गांधीधाम- तिरुनेलवेली या रेल्वेत २९ एलएचबी कोच आहेत. त्यात थ्री टायर वातानुकूलित १२, स्लीपर सहा, पॅन्ट्री कार १ तर जनरेटर कार दोन अशी डब्यांची रचना ठेवण्यात आली आहे. प्रवाशांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशी असेल रेलेवेची वेळ
ही फेस्टिवल स्पेशल गाडी दर सोमवारी गांधीधामहून पहाटे ४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ वा. ३५ मिनिटांनी ती तामिळनाडूतील तिरुनेलवेलीला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सकाळी ७ वा ४० मिनिटांनी तिरुनेलवेलीहून सुटेल आणि गुजरातमधील गांधीधामला ती तिसऱ्या दिवशी पहाटे २ वा ३५ मिनिटांनी पोहचेल. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या या गाडीत २९ एलएचबी कोच आहेत. त्यात थ्री टायर वातानुकूलित १२, स्लीपर सहा , पॅन्ट्री कार १ तर जनरेटर कार दोन अशी डब्यांची रचना ठेवण्यात आली आहे. प्रवाशांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
'या' ठिकाणी थांबे
या गाडीला अहमदाबाद जंक्शन, वडोदरा सुरत, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, कारवार, मंगळुरु, कोझिकोड, शोरनूर, त्रिशूर, एर्नाकुलम, कन्याकुलम, तिरुअनंतरपुरम सेंट्रल व नागरकोईल असे थांबे असणार आहेत.