महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Rajan Salvi: जनतेच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही रिफायनरीचे राजापूर नगरीत स्वागत करु -आ. राजन साळवी - महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद

जनतेच्या वतीने ज्या मागण्या दिल्या आहेत त्या पूर्ण करा, आम्ही रिफायनरीचे (Barsu Refinery) राजापूर नगरीत स्वागत करु. पण दुर्दैवाने या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधात उतरू असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते, आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांनी म्हटलं आहे.

Rajan Salvi
जनतेच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही रिफायनरीचे राजापूर नगरीत स्वागत करु -आ. राजन साळवी

By

Published : Nov 23, 2022, 4:19 PM IST

रत्नागिरी:जनतेच्या वतीने ज्या मागण्या दिल्या आहेत त्या पूर्ण करा, आम्ही रिफायनरीचे (Barsu Refinery) राजापूर नगरीत स्वागत करु. पण दुर्दैवाने या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधात उतरू असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते, आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. यावेळी राजन साळवी म्हणाले, मी कालच्या रिफायनरी संंदर्भातील कालच्या हाय कमिटी समोर मी पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. या सर्व मागण्यांना तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

जनतेच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही रिफायनरीचे राजापूर नगरीत स्वागत करु -आ. राजन साळवी

तर कंपनीच्या विरोधात- पण त्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचे सीईओ आणि त्यांच्या यंत्रणेसोबत बैठक करावी लागेल. उद्योग विभाग (Department of Industry) आणि कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये हे मुद्दे मांडले जातील. त्यांच्याकडून अंतिम मंजूरी घेतली जाईल. जनतेच्या वतीने ज्या मागण्या दिल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा, आम्ही रिफायनरीचे राजापूर नगरीत स्वागत करु. पण दुर्दैवाने या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधात उतरावे लागेल हि माझी स्पष्ट भूमिका असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

तर कर्नाटकच्या सीमा भागापर्यंत जावू -राजन साळवी(Mharashtra karnataka border Dispute)कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका योग्य नाही. त्यांच्या या भूमिकेचा मी निषेध करतो. जत मधील ४० गावे आमची आहेत आणि आमचीच राहणार, जर ती घेण्याचा प्रयत्न कर्नाटकने केला तर महाराष्ट्रातील मराठी माणसे आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरू, गरज पडल्यास आम्ही कर्नाटकच्या सीमा भागापर्यंत जावू अशा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details