रत्नागिरी - जिल्ह्यातील शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी एकाच दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जोरदार शक्तिप्रदर्शन करत दापोली, चिपळूण, गुहागर आणि राजापूरमधील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय कदम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. ते दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
हेही वाचा - रत्नागिरीत पाचही जागा शिवसेनेच्या वाट्याला; भाजप कार्यकर्त्यांचा बंडखोरीचा पवित्रा
गुहागर मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गुहागर हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. मात्र, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधव यांच्यासाठी युतीकडून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला.