महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोळकेवाडी धरणात अलोरेमधील चारजण बुडाले, दोघांना वाचविण्यात यश - Four drowned in Kolkewadi dam

अलोरे येथील चार युवक कोलकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले होते. कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने चोघेही बुडाले. हे चौघेही बुडत असताना धनगर बांधवांनी दोघाना वाचवले तर दोघे अद्याप बेपत्ता आहेत. त्यात अलोरे सोमेश्वर मंदिर नजीक राहणारा सुजय संजय गावठे व त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर यांचा समावेश आहे.

कोळकेवाडी धरणात अलोरे मधील चार जण बुडाले  दोघांना वाचविण्यात यश
कोळकेवाडी धरणात अलोरे मधील चार जण बुडाले दोघांना वाचविण्यात यश

By

Published : Apr 27, 2022, 9:30 PM IST

रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील चार युवक कोलकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले होते. कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने चोघेही बुडाले. हे चौघेही बुडत असताना धनगर बांधवांनी दोघाना वाचवले तर दोघे अद्याप बेपत्ता आहेत. त्यात अलोरे सोमेश्वर मंदिर नजीक राहणारा सुजय संजय गावठे व त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर यांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सायंकाळी ५च्या दरम्यान बेपत्ता सुजय गावठे, ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर सोबत शाहीन कुट्टीनो, रुद्र जंगम कोळकेवाडी टप्पा चार नजीक कालव्यात पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेल्यावर ही दुर्घटना घडली. पाण्यात अडकताच त्यांनी आरडाओरड केली. जवळच काम करणाऱ्या धनगर बांधवांनी तिथे धाव घेतली. रुद्र आणि शाहीन यांना त्यांनी बाहेर काढले. यावेळी सुजय बाहेर येत होता, मात्र ऐशवर्या बुडत असल्याचे बघून पाण्यात परत गेला. त्यानंतर दोघे बेपत्ता झाले. अलोरे पंचक्रोशीतील जि प सदस्य विनोद झगडे, तुषार चव्हाण, प्रमोद महाजन, घनश्याम पालांडे, प्रकाश आंब्रे आणि अनेक युवा कार्यकर्त्यांनी कोळकेवाडी धरण परिसराकडे धाव घेतली. त्यानंतर बचाव कार्य सुरुवात केली. त्यानंतर आलोरे शिरगाव पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाहणी केली. बेपत्ता असलेल्या दोघांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रात्र होती त्यामुळे बचावकार्य 7.30 नंतर थांबवण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details