रत्नागिरी -गणपतीपुळे समुद्रात आज सकाळच्या सुमारास चार जण बुडाल्याची घटना घडली होती. यांपैकी एका मुलीला वाचविण्यात यश आले. तर तिघांचे मृतदेह सापडले आहेत.
गणपतीपुळे समुद्रात चार जण बुडाले; एकीला वाचविण्यात यश, तिघांचे मृतदेह सापडले - तीन जण समुद्रात बुडाले
कोल्हापूर (कसबा बावडा) येथून गणपतीपुळे येथे देव दर्शनासाठी एक कुटुंब आले होते. आज सकाळी समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही. हे चौघेही समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते.
कोल्हापूर (कसबा बावडा) येथून गणपतीपुळे येथे देव दर्शनासाठी एक कुटुंब आले होते. आज सकाळी समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही. हे चौघेही समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. देवस्थानच्या सुरक्षारक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी समुद्राकडे धाव घेतली आणि बुडणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यात एका मुलीला वाचविण्यात त्यांना यश आले आहे. सुरक्षारक्षक गुरुप्रसाद बलकटे यांनी समुद्रात रिंग टाकून या मुलीला वाचविले. या चौघांपैकी काजल मचले, सुमन विशाल मचले आणि राहुल अशोक बागडे यांचे मृतदेह सापडले आहेत.