महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लांजा तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी धावले नवी मुंबईचे माजी उपमहापौर - अविनाश लाड कोरोना मदत

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. ठिकठिकाणी आरोग्य साधनांची कमतरता जाणवत आहे. रत्नागिरीतील लांजा तालुक्याच्या मदतीला नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड धावून आले आहेत.

Avinash Lad Corona aid to Lanja
काँग्रेस नेते अविनाश लाड लांजा तालुका मदत

By

Published : May 4, 2021, 10:28 AM IST

रत्नागिरी - लांजा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड धावून आले आहेत. लाड यांनी लांजा तालुक्यातील देवधे कोविड केअर सेंटरसाठी एक अद्ययावत रुग्णवाहिका, ऑक्सिजन मशीन, स्टीमर उपलब्ध करून दिले आहेत. कोरोनाबाधितांना हळदीचे दूध देण्याची व्यवस्था देखील त्यांनी केली आहे. सोमवारी या उपक्रमांचा देवधे कोविड सेंटर येथे शुभारंभ करण्यात आला.

नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी देवधे येथे रुग्णवाहिका दिली

रुग्णवाहिके अभावी होते रुग्णांची हेळसांड -

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात हे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लांजा तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही. खासगी रुग्णवाहिका चालक अव्वाच्या-सव्वा पैसे आकारतात. सर्वसामान्य रुग्णांना ते परवडत नाही व त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. ही गैरसोय लक्षात घेऊन जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तसेच नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी 'ना नफा ना तोटा' तत्वावर लांजा तालुक्यासाठी एक अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

सध्या रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने अनेकांनी प्राण गमावले आहेत. देवधे येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अविनाश लाड यांनी 'ऑक्सिजन सेरेमीटर मशीन' उपलब्ध करून दिली आहे. तसेच रुग्णांना वाफ घेण्यासाठी स्टीमर आणि रोज रात्री हळदीचं दूध देण्याची व्यवस्था काँग्रेसकडून करण्यात आली. अविनाश लाड देवधे कोविड सेंटरच्या मदतीसाठी धावून आल्याने तालुका प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहेत.

यावेळी माजी आमदार हुसनबानो खलिफे, माजी सभापती श्रीकृष्ण हेगिष्ठे, तहसीलदार समाधान गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे, डॉ. संकेत पेडणेकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details