महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप प्रवेश नाकारल्यानंतर राष्ट्रवादीचा 'हा' नेता शिवसेनेच्या संपर्कात; अनंत गीतेंचा गौप्यस्फोट - Anant Geet Sunil Tatkare disclosure news

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर होते. भाजपने प्रवेश नाकारल्यानंतर तटकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार होते. ते अजूनही आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय व अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केला आहे.

माजी उद्योग मंत्री अनंत गीते

By

Published : Oct 17, 2019, 9:32 PM IST

रत्नागिरी- लोकसभा निवडणुकी दरम्यान खासदार सुनील तटकरे मातोश्रीवर सारखे घिरट्या घालत होते, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय व अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केला आहे. गुहागर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी ते चिपळुणातील कोंढे येथ आले होते. यावेळी बैठकी दरम्यान गीते यांनी सदर खुलासा केला.

सभेला संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते

सगळीकडेच विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी माजी उद्योग मंत्री अनंत गीते हे कोंढे येथे आले होते. यावेळी प्रचार सभेच्या दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर होते. भाजपने प्रवेश नकारल्यानंतर तटकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार होते. ते अजूनही आमच्या संपर्कात आसल्याचे गीते यांनी सांगितले. त्याचबरोबर, सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केलल्या वक्तव्याचा देखील अनंत गीते यांनी खरपूस समाचार घेतला. आत्ताफक्त सुळेच राहिल्या, बाकी सर्व गेले, असे गीते यांनी म्हटले.

हेही वाचा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठे अडकले पर्यावरणमंत्री?

ABOUT THE AUTHOR

...view details