रत्नागिरी - विदेशी पर्यटक स्वच्छतेच्या बाबतीत किती दक्ष असतात ते जर्मनीतून आलेल्या पर्यटकांनी दाखवून दिले आहे. दोन विदेशी पर्यटक मांडवी येथील समुद्रकिनारा स्वच्छ करत असल्याचा एक व्हीडीओ चांगलाच व्हयरल झाला आहे.
विदेशी पर्यटकांनी भारतीयांसमोर ठेवला अनोखा आदर्श
फेलिक्स वरगा आणि जेनी क्रिस्ट हे भारतात फिरण्यासाठी आले आहेत. हे दोघे मांडवी जवळच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यावेळी हॉटेलच्या समोर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कचरा त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर त्यांनी किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरवात केली. परदेशातून आलेले पर्यटक किनाऱ्याची साफ सफाई करत असल्याचे पाहताच परिसरातील नागरिकही या स्वच्छता मोहिमेत उतरले.
हेही वाचा -व्याघ्र दर्शनाच्या ओढीने पर्यटकांनी फुलले टीपेश्वर अभयारण्य
फेलिक्स वरगा आणि जेनी क्रिस्ट हे भारतात फिरण्यासाठी आले आहेत. हे दोघे मांडवी जवळच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यावेळी हॉटेलच्या समोर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कचरा त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर त्यांनी किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरवात केली. परदेशातून आलेले पर्यटक किनाऱ्याची साफ सफाई करत असल्याचे पाहताच परिसरातील नागरिकही या स्वच्छता मोहिमेत उतरले. अस्वच्छता पसवणाऱ्या प्रत्येकाच्याच डोळ्यात या पर्यटकांनी अंजन घालण्याचे काम केले.