महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिकारीसाठी बिबट्या घुसला थेट पेट्रोल पंपात, पराक्रम सीटीव्हीत कैद - Ratnagiri latest news

शिकारीसाठी बिबट्या थेट पेट्रोल पंपात घुसल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे घडली आहे.

बिबट्या
बिबट्या

By

Published : Feb 10, 2021, 3:14 PM IST

रत्नागिरी -शिकारीसाठी बिबट्या थेट पेट्रोल पंपात घुसल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे घडली आहे. बिबट्याचा हा पराक्रम सीटीव्हीत कैद झाला आहे. मानवी वस्तीत बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. याचा पुन्हा एकदा अनुभव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावच्या पेट्रोल पंपावर आला.

शिकारीसाठी बिबट्या घुसला थेट पेट्रोल पंपात

भक्ष्यावर घातली झडप-

मध्यरात्री बिबट्या शिकारीसाठी थेट पेट्रोल पंपात घुसला. त्यानंतर त्यानं भक्ष्यावर झडप देखील घातली. यावेळी बाहेर उडालेल्या गोंधळामुळे आतील खोलीत झोपलेला कामगार देखील जागा झाला. तोच त्याला बाहेर बिबट्या दिसला. समोर बिबट्या पाहताच कामगार देखील घाबरून गेला.

घटना सीसीटीव्ही कैद-

ही सारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. 6 फेब्रुवारीची ही घटना असून मध्यरात्री 3.15 वाजता हा थरार पेट्रोल पंपामध्ये रंगला होता. दरम्यान बिबट्याचा वावर मानवी वस्तीतही वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे.

हेही वाचा-यवतमाळमध्ये गोळ्या घालून ठार मारलेली टी -१ वाघीण नरभक्षक नव्हती, याचिकाकर्त्याचा न्यायालयात दावा

ABOUT THE AUTHOR

...view details