रत्नागिरी- कोकणात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. कोकणात तापमानाचा पारा खाली आलेला पहायला मिळत आहे. सध्या याच बोचऱ्या थंडीने कोकणवासीयांना हुडहुडी भरवली आहे. या वाढलेल्या थंडीमुळे सध्या धुक्याची चादर सर्वत्र पहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्ग देखील सध्या या धुक्यात हरवून गेला आहे. नऊ वाजेपर्यंत दाट धुके असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला आहे.
धुक्यात हरवला मुंबई-गोवा महामार्ग
कोकणात हुडहुडी भरवणारी थंडी पसरलेली आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग धुक्यात हरवल्याचे चित्र आहे.
धुक्यात हरवला मुंबई-गोवा महामार्ग
भारतामध्ये प्रचंड थंडीची लाट पसरली आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने थंडीमध्ये वाढ झाली असून तापमान खालावत चालले आहे. कोकणाला प्रती काश्मीर म्हटले जाते. कोकणात सध्या त्याची प्रचिती येत आहे. कारण, सर्वत्र धुके पसरले आहे. वाहन चालकांना धुक्यातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
हेही वाचा - खेडमधील फुरूस येथे कार नदीत कोसळून एकाचा मृत्यू