महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत पसरली दाट धुक्याची चादर - थंडी

विशेषत: घाट रस्त्यात सर्वाधिक धुके पहायला मिळाले. त्यामुळेच कोकणातील नागमोडी वळणाच्या घाटातील  रस्ते धुक्याने झाकून गेले असून या रस्त्याचे सौदर्य खुलले आहे. रत्नागिरीतील काजरघाटी घाटात असेच धुके पहायला मिळत आहे.

रत्नागिरीत पसरलेली दाट धुक्याची चादर

By

Published : Mar 10, 2019, 3:38 PM IST

रत्नागिरी -थंडीचा हंगाम संपत असतानाच रत्नागिरीत पुन्हा थंडी पडायला सुरुवात झाली आहे. शहर व परिसरात गेल्या ४ दिवसांपासून थंडी पडत असून सकाळच्या वेळेत हा गारवा चांगलाच जाणवतो आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळते. दाट धुक्यांमुळे कोकणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

रत्नागिरीत पसरलेली दाट धुक्याची चादर

विशेषत: घाट रस्त्यात सर्वाधिक धुके पहायला मिळाले. त्यामुळेच कोकणातील नागमोडी वळणाच्या घाटातील रस्ते धुक्याने झाकून गेले असून या रस्त्याचे सौदर्य खुलले आहे. रत्नागिरीतील काजरघाटी घाटात असेच धुके पहायला मिळत आहे.

या वातावरणाचा परिणाम आंब्यावर होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details