रत्नागिरी - जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यातच रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला आलेल्या पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी मानवी वस्तीत घुसल्याने पोमेंडीतल्या काजरघाटी परिसरातील 12 घरात पाणी घुसले आहे. या घरांमध्ये सध्या जवळपास 8 ते 10 फूट पाणी गेल्यामुळे ही घरे जलमय झाली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीला पूर, काजरघाटीतील 12 घरे पाण्याखाली - ग्रामस्थ
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यातच रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला आलेल्या पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी मानवी वस्तीत घुसल्याने पोमेंडीतल्या काजरघाटी परिसरातील 12 घरांत पाणी घुसले आहे. या घरांमध्ये सध्या जवळपास 8 ते 10 फूट पाणी गेल्यामुळे ही घरे जलमय झाली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीला पूर
दरम्यान, आजूबाजूच्या ग्रामस्थांनी मध्यरात्री या १२ घरातील लोकांना रात्री सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र, घरातील वस्तू, साहित्य यांचे पूर्ण नुकसान झाले आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी जलमय झालेल्या या ११ घरांचा आढावा घेत इथल्या नागरिकांशी बातचीत केली.