महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर; मुंबई गोवा महामार्ग ठप्प - मुंबई गोवा महामार्ग

सलग तिसऱ्या दिवशी वादळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला असून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. तर अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे.

heavy rain in ratnagiri
मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर; मुंबई गोवा महामार्ग ठप्प

By

Published : Aug 5, 2020, 2:56 PM IST

रत्नागिरी - सलग तिसऱ्या दिवशी वादळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला असून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. तर अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे.

मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर; मुंबई गोवा महामार्ग ठप्प

जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्या या मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या पुलांखालून वाहतात. मुसळधार पावसाने या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठची भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर काही ठिकाणी पुराचे पाणी बाजारपेठांमध्ये घुसलं आहे.

दरम्यान, खेडमधील जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता वढलीय. येथे इशारा पातळी 6 मीटर असून धोक्याची पातळी 7 मीटर आहे. सध्या प्रवाह 6.75 मीटरवर आहे. तर काजळी, शास्त्री, बावनदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

जिल्ह्यातील नद्यांची सद्यस्थिती(कंसातील आकडे अनुक्रमे धोका पातळी व इशारा पातळीचे आहेत)

चिपळूण वाशिष्ठी 4.88 मी. (5 मी. व 7 मी.), लांजा काजळी 18.34 (16.5 मी व 18 मी.) राजापूर, कोदवली 8.20 (4.90 मी व 8.13 मी), खेड जगबुडी 6.75 मी. (6 मी व 7 मी.), संगमेश्वर शास्त्री 6.40 मी. (6.20 मी. व 7.80 मी.), संगमेश्वर सोनवी 6.20 मी. (7.20 मी व 8.60 मी.), लांजा मुचकुंदी 2.40 मी. (3.50 मी व 4.50 मी.), संगमेश्वर बावनदी 11.80 मी. (9.40 मी व 11 मी.)

ABOUT THE AUTHOR

...view details