महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काजळी नदीच्या पुराचा देवस्थानाला फटका, लांजा तालुक्यातील मठ येथील दत्तमंदिर पाण्याखाली - Datta Mandir in Lanja taluka news

जिल्ह्यात मुसळधार बरसणाऱ्या पावसाने आज सकाळपासून काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

Datta Mandir in Lanja taluka under water
मठ येथील दत्त मंदीर पाण्याखाली

By

Published : Jul 6, 2022, 9:28 AM IST

रत्नागिरी -जिल्ह्यात मुसळधार बरसणाऱ्या पावसाने आज सकाळपासून काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच, नद्यांना आलेल्या पुरामुळे आजही शहर किंवा ग्रामीणचा काही भाग पाण्याखाली आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीच्या पुराचा फटका मठ येथील देवस्थानाला बसला असून, हे देवस्थान गेले तीन दिवस पाण्यात आहे.

पुराच्या पाण्याने दत्त मंदिराला वेढा घातल्याचे दृश्य

हेही वाचा -Ratnagiri Rain : रत्नागिरीत पावसाची जोरदार बॅटींग; मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंदच

लांजा तालुक्यातील मठ येथील मंदिर हे स्वयंभू दत्तमंदिर आहे. ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सद्यस्थितीत मंदिराचा अर्धा भाग हा पाण्यात बुडालेला आहे. पाऊस जर असाच पडत राहिला तर मंदिराच्या कळसापर्यंत हे पाणी पोहचेल, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणाहून भाविक या दत्तमंदिरात दर्शनासाठी येत असतात. आता हे पुराचे पाणी कधी ओसरते याकडे भाविकांचे व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

7 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता - गेले 2 दिवस मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही काल पावसाची धुवाधार बरसात झाली. हवामान खात्याने जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा होताना पाहायला मिळत आहे. 4 जुलैपासून सुरू झालेली पावसाची बॅटिंग आजही सुरूच आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीही कमालीची वाढ झालेली आहे.

जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका -जिल्ह्याला सोमवारी मुसळधार पावसाने ( Heavy rain in Ratnagiri district ) झोडपून काढले. त्यामुळे, काही ठिकाणी पाणी तुंबले, तर काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शहरात घुसले. त्यामुळे, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण शहर ( Chiplun rainfall news ) आणि ग्रामीण भागात सोमवारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. धो-धो असा पाऊस पडत होता. त्यामुळे, चिपळूण शहरात ( Rivers crossed warning level in Ratnagiri ) अनेक ठिकाणी पाणी तुंबले. महामार्गावर डीबीजे कॉलेज, तसेच कापसाळ येथे पाणी तुंबल्याने वाहतूक पूर्णतः कोळमडली होती. एक ते दीड फूट पाण्यातून ( Ratnagiri rainfall ) वाहने काढली जात होती. सलग मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच पहिल्याच पावसात चिपळूणमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

तरी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं -चिपळूण शहरात पुराचं पाणी आलं नसलं तरी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. अनंत आईस फॅक्ट्री, तसेच जिप्सी कॉर्नर जुना भैरी रस्ता, लोकमान्य टिळक वाचनालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालक व नागरिकांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. अर्धवट झालेली नाले सफाई, तसेच महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे पहिल्याच पावसात शहराची ही अवस्था झाल्याचे नागरिक सांगत होते.

हेही वाचा -रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार.. काही नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, चिपळूणमध्ये पाणी तुंबलं

ABOUT THE AUTHOR

...view details