रत्नागिरी -रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. एनडीआरएफची रात्रीही या ठिकाणी हजर होती, सध्या एनडीआरएफचीकडून या पुरजन्य भागाची पाहणी सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे टेंभ्ये गावात पूरजन्य परिस्थिती, एनडीआरएफकडून पाहणी
रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे याठिकाणी एनडीआरएफच्या पथकांना तैनात करण्यात आलं असून त्यांच्याकडून पाहणी सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला..
जिल्ह्यातील काही भागात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरुन पाणी जात होतं. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावरुन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दुचाकी वाहून गेल्या तर एक नॅनो कार वाहून गेली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. एनडीआरएफच्या टीमने दुचाकीस्वारांना वाचवले. पाण्याचा जोर एवढा होता की रस्त्याच्या बाजूचा भाग पुर्णपणे वाहून गेला. पाण्याच्या प्रवाहात अडकलेली नॅनो कारदेखील वाहून गेली. सकाळी एनडीआरएफच्या टीमने या भागाची पाहणी केली आणि कोणता अनुचित प्रकार घडल्याची तसेच कुणी अडकलं नसल्याची खात्री केली. सध्या एनडीआरएफचे पथक पुरजन्य भागाची पाहणी करत आहे. ज्या भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण होते त्या भागातील नागरीकांनी काळजी घ्यावी. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करुन धाडस करू नये, असे आवाहन एनडीआरएफ कडून करण्यात आले आहे.