रत्नागिरी - दाभोळ बंदरात उभ्या असलेल्या एका बोटीला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोटीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
दाभोळ बंदरात मासेमारी बोटीला आग; जीवितहानी नाही - दाभोळ बंदर
दाभोळ बंदराजवळ उभ्या असलेल्या मासेमारी बोटीला मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी बोटीत काही खलाशीही होते. या सर्वांनी पाण्यात उड्या मारल्या.
बोटीला आग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस बंद असलेल्या मासेमारीला सध्या परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, दाभोळ बंदराजवळ उभ्या असलेल्या मासेमारी बोटीला मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी बोटीत काही खलाशीही होते. या सर्वांनी पाण्यात उड्या मारल्या. बंदरात बाजूला उभ्या असलेल्या बोटिंनी आग विझवण्यासाठी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही.