महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एलईडी लाईट्सच्या साहाय्याने मासेमारी, तीन बोटींवर कारवाई - अवैध पद्धीने मासेमारी रत्नागिरी

एलईडी लाईटद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीविरोधात सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. जयगड नंतर आता मिरकरवाडा बंदरात 3 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या तीन नौकांवरील 108 एलईडी लाईट्स, 4 बलार्ड, होल्डर व वायर असे सुमारे 17 लाख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

एलईडी लाईट्सच्या साहाय्याने मासेमारी, तीन बोटींवर कारवाई
एलईडी लाईट्सच्या साहाय्याने मासेमारी, तीन बोटींवर कारवाई

By

Published : Mar 30, 2021, 5:33 PM IST

रत्नागिरी -एलईडी लाईटद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीविरोधात सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. जयगड नंतर आता मिरकरवाडा बंदरात 3 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या तीन नौकांवरील 108 एलईडी लाईट्स, 4 बलार्ड, होल्डर व वायर असे सुमारे 17 लाख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर तीनही नौका मिरकरवाडा बंदरामध्ये लावण्यात आल्या आहेत.

एलईडी विरोधात मत्स्य विभागाची धडक मोहीम

एलईडी दिव्याचा वापर करून होणाऱ्या मासेमारी विरोधात सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त ना. वि. भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे. चार दिवसांपूर्वी जयगडमधील एका नौकेवर एलईडी लाईट्स सापडल्याने या नौकेवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान मिरकरवाडा बंदरात गस्ती नौका माऊली साईद्वारे धडक मोहीम राबवून, मिरकरवाडा बंदरातील नौकांची संयुक्त तपासणी करण्यात आली. ही संयुक्त कारवाई सहायक मत्स्य आयुक्त भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली र. प्र. राजम, मिरकरवाडा बंदर प्राधिकरण सं. अ. देसाई, प. अ. गुहागर, प्र. ल. महाडवाला, प. अ. नाटे, दी. आ. साळवी, प. अ. दाभोळ, तृ.ध. जाधव, सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर, 11 सुरक्षा रक्षक व 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

17 लाखांचं साहित्य जप्त

या तपासणीदरम्यान तेहसिन मर्यम, खादिजा सानिया, अलआरोष या तीन नौकांवर एलईडीचा वापर केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 108 एलईडी लाईट, 4 बलार्ड, होल्डर व वायर असे सुमारे 17 लाख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तीनही नौकांवर जप्तीची कारवाई करून, त्या मिरकरवाडा बंदरामध्ये लावून ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -बाजारपेठेत खरेदीला जाणा-या ग्राहकांवर टोल, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनोखी शक्कल

ABOUT THE AUTHOR

...view details