महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मासेमारी हंगामाचा मुहूर्त टळला; समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे हंगाम लांबणीवर पडणार - वादळसदृष्य परिस्थिती

साधारण १ ऑगस्टपासून दरवर्षी मासेमारी हंगाम सुरू होत असतो. यावर्षी मात्र मासेमारी उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. समुद्रात मासेमारीसाठी अनुकूल परिस्थिती नाही.

समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे मासेमारी हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे

By

Published : Aug 1, 2019, 6:59 PM IST

रत्नागिरी -आजपासून सुरु होणाऱ्या मासेमारी हंगामाचा मुहूर्त टळला आहे. सध्या समुद्र खवळलेला असुन वेगवान वारेही वाहत आहेत. त्यामुळे मासेमारी हंगाम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे मासेमारी हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे
मागील दोन महिने शासकीय नियमानुसार समुद्रात मासेमारीला जाण्यास बंदी असते. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत समुद्रात मासेमारी बंद असते. १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू होतो. मात्र मासेमारी हंगामाच्या पहिल्याच दिवशी आज जिल्ह्यातील मच्छिमारी नौका समुद्रात गेल्या नाहीत. सध्या खोलसमुद्रात वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ३ ऑगस्टपर्यंत खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन मत्स्य विभागाने मच्छिमारांना केले आहे. समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे यंदा मासेमारीचा शासकीय मुहुर्त टळला आहे. त्यामुळे अनेक बंदरात आजही बोटी किनाऱ्याला विसावलेल्या पहायला मिळाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details