रत्नागिरी- अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला तडाखा दिला आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात पावसासह वेगवान वार्यांनी धुमाकुळ घातला आहे. त्यात अजस्र लाटांनी किनारे उद्ध्वस्त झाले आहेत. या वादळाच्या परिणामामुळे मासेमारीही ठप्प झाली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
‘क्यार’ चक्रीवादळामुळे बाहेरच्या अनेक बोटी रत्नागिरीत आश्रयाला आल्या आहेत. हे वादळ किनारपट्टीला धडकणार नसले तरी, पुढील २४ तासात त्याच्या घेऱ्यातील ढगांमुळे कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २७ तारखेनंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल. सध्या मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच या पर्यटकांनीही समुद्रकिनाऱ्यांवर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.