रत्नागिरी- येथील राजिवडा येथे मच्छिमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना शनिवारी घडली आहे. सादिक म्हसकर यांची ही नौका असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा - महाजनादेश यात्रेत 'एकच वादा अजित दादा'चा जयघोष, पोलिसांचा लाठिचार्ज
सादिक म्हसकर आपली मासेमारी नौका घेऊन शनिवारी सकाळी मासेमारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत अन्य दोन मच्छीमारही होते. कुर्लीसमोरच्या पाण्यामध्ये मासेमारीसाठी त्यांनी जाळे टाकले. मात्र, लाटा आणि पाण्याच्या प्रवाहाने जाळे नौकेच्या पंख्यामध्ये अडकले. त्यामुळे नौकेचे इंजिन बंद पडले. नौका भरकटून लाटांच्या तडाख्यात सापडली. काही भाग तुटल्याने नौकेत पाणी शिरले आणि नौका बुडू लागली.