रत्नागिरी- कोरोनाच्या लढ्यात सरकारला मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केली आहे. दरम्यान पर्ससिन नेट मच्छीमार संघाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 लाखांची मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सोपवला.
कोरोनाशी लढा; पर्ससिन नेट मच्छीमार संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 2 लाखांची मदत - खासदार विनायक राऊत
यावर्षी मच्छीमारांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. समुद्रातील वादळे आणि खराब हवामान यामुळे यावर्षीचा निम्मा हंगाम वाया गेला. मात्र तरीही कोरोनाशी लढा देण्यासाठी पर्ससिन नेट मच्छीमार संघाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 लाखांची मदत करण्यात आली.
कोरोना संसर्गामुळे सध्या संपूर्ण देशभर संचारबंदी सुरू आहे. अनेक व्यवसाय ठप्प आहेत. दरम्यान यावर्षी मच्छीमारांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. समुद्रातील वादळे आणि खराब हवामान यामुळे यावर्षीचा निम्मा हंगाम वाया गेला. त्यात आता कोरोनामुळे मच्छीमार संकटात सापडला आहे. असे असताना देखील पर्ससीननेट मच्छीमार संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विरुद्धच्या लढाईत आपला हातभार लावला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रत्नागिरी जिल्हा मच्छीमार पर्ससीन नेट असोसिएशन आणि पर्ससीन नेट मच्छीमार रत्नागिरी तालुका असोसिएशन यांच्याकडून प्रत्येकी रुपये 1 लाखांचा धनादेश खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पर्ससीन संघटनेचे विकास सावंत, नासिर वाघू, नुरा पटेल, हनिफ महालदार, जावेद होडेकर आदी उपस्थित होते.