रत्नागिरी- कोकणातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कोकणातील पहिले भाजीपाला शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) आणि आंबे पिकवण्याची यंत्रणा रत्नागिरीत (रॅपनिंग चेंबर) उभे राहत आहे. पणन महामंडळाच्या माध्यमातून आमदार योगेश कदम यांनी कोकणातला हा पहिला प्रकल्प उभारायला सुरुवात केली आहे. साडेआठ कोटींच्या या प्रकल्पातून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बाजारभावाप्रमाणे भाजीपाल्याचा दर मिळणार आहे.
रत्नागिरीत उभं राहतंय कोकणातील पहिले भाजीपाला शीतगृह - कोकणातील भाजीपाला शीतगृह
भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची भाजी थेट बांधावर बाजारभावाने विकत घेऊन या शीतगृहामध्ये आणली जाणार आहे. ५० टन भाजीपाला साठवण्याची व्यवस्था येथे उभारण्यात येत आहे. तर २५ टन आंबा पिकवण्याची यंत्रणा येथे उभारण्यात येत आहे.
रत्नागिरी
कोकणातील शेतकरी स्वयंपूर्ण होण्यास हातभार
पणन महामंडळाच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पाची पाहणी शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी केली. आजपर्यंत भाजीपाल्यासाठी पश्चिम महाराष्ट्रावर कोकणाला अवलंबून रहावे लागत होते. मात्र, या कोकणातील पहिल्या योजनेमुळे येथील शेतकरी खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होण्यास हातभार लागणार आहे. मे महिन्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.