रत्नागिरी -एका व्यावसायिकावर इमारतीच्या पार्किंगमध्ये बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शहरातील बंदर रोड परिसरातील लक्ष्मी नारायण अपार्टमेंटमध्ये घडली. येथील प्रसिद्ध उद्योजक आणि नॅशनल मोबाईल शॉपीचे मालक मनोहर ढेकणे यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
रत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर बेछूट गोळीबार; कारण अस्पष्ट - firing on buisenessman ratnagiri
शुक्रवारी रात्री मनोहर ढेकणे दुकान बंद करून घरी परतले. यावेळी त्यांच्या मागावर हे मारेकरी होते. त्यांनी ढेकणेंना इमारतीच्या पार्किंगमध्ये गाठले आणि त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळापरून पोबारा केला.
शुक्रवारी रात्री मनोहर ढेकणे दुकान बंद करून घरी परतले. यावेळी त्यांच्या मागावर हे मारेकरी होते. त्यांनी ढेकणेंना इमारतीच्या पार्किंगमध्ये गाठले आणि त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळापरून पोबारा केला. त्यातील एक गोळी ढेकणे यांच्या पोटात घुसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गंभीर जखमी झालेल्या ढेकणे यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रत्नागिरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच हा हल्ला नेमका का करण्यात आला, याचाही तपास पोलीस करत आहेत. तर या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -उल्हासनगरातील 6 मजली इमारतीची भीषण आग सहा तासानंतर आटोक्यात