महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साखरतर येथे मासेमारी शेड आगीत जळून खाक - fire of fishing shed at ratnagiri

सोमवारी मासे साठवणूक करणाऱ्या शेडला आग लागली. अचानक आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. या आगीत मासेमारी शेड पुर्णपणे जळून खाक झाली.

fire of fishing shed
साखरतर येथे मासेमारी शेड आगीत जळून खाक

By

Published : Oct 6, 2020, 7:48 PM IST

रत्नागिरी -तालुक्यातील साखरतर पुलाखाली आगीत मासेमारी शेड जळून खाक झाली. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. शेडसह शेडमधील मासळीचे बॉक्स आणि पेट्यादेखील जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. साखरतर येथील नौशाद राजपुरकर यांच्या मालकीचे हे शेड आहे. साखरतर मोठे बंदर असल्याने या बंदरानजिक पुलाजवळ मासेमारी शेड उभारण्यात आले आहेत. या शेडमध्ये माल साठवून ठेवला जातो.

सोमवारी मासे साठवणूक करणाऱ्या शेडला आग लागली. अचानक आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. या आगीत मासेमारी शेड पुर्णपणे जळून खाक झाली. स्थानिक जागृत ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. वेळीच आग आटोक्यात आल्याने आजुबाजुला ही आग पसरली नाही. या आगीत नौशाद राजपुरकर यांचे मासेमारी शेड जळून खाक झाले. शेडमधील मासळी साठवण्याचे बॉक्स आणि टबदेखील जळाले. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details