रत्नागिरी -शहरातील मिरकरवाडा येथे झोपड्यांना पहाटेच्या वेळी अचानक आग लागली. पहाटे तीनच्या दरम्यान ही आग लागली होती. या आगीत बोटीचे साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या दोन झोपड्या आणि टेम्पो जळून खाक झाला.
रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे दोन झोपड्यांना आग; टेम्पो जळून खाक
आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. एक टेम्पो आणि झोपडीत असलेले बोटींचे साहित्यही जळाले. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही, मात्र, या आगीत लाखोंची हानी झाली आहे.
रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे दोन झोपड्यांना आग
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून आगीमुळे लाखोंचे नुकसान मात्र झाले आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटी मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छिची करोडो रूपयांची उलाढाल देखील होते. शिवाय, बोटी देखील येथेच नांगर टाकून बंदरात उभ्या केलेल्या असतात.
जेटीजवळ मासेमारी बोटीचे साहित्य ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन झोपड्यांना अचानक आग लागली. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले.