रत्नागिरी -जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील गिमवी मुंढर माळरानावर मोठा वणवा लागला असून यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली आहे.
जिल्ह्यात सध्या वणव्याचं सत्र सुरूच आहे. गुहागर आणि राजापूर तालुक्यांमध्ये या महिनाभरात काही ठिकाणी वणवे लागल्याच्या घटना घडल्या होत्या. गेल्या आठवड्यात राजापूर शहरालगतच्या डोंगरावर मोठा वणवा लागला होता. त्यामध्येही आंबा, काजूची आणि इतर वनसंपदा जळून खाक झाली होती. त्यानंतर आज (गुरुवार) गुहागर तालुक्यातील गिमवीकडून मुंढर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेच्या माळरानावर वणवा लागला.