खेड (रत्नागिरी)- दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी आमदार निधीतून 50 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीनचे वाटप करणार असल्याचे जाहीर केले आहे. यातील 25 कॉन्सन्ट्रेटर दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांना वाटप केले असून, आणखी 25 कॉन्सन्ट्रेटर 2 ते 3 दिवसांत उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण दगावत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या शहरातील रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र लोकांचे जीव वाचवायला उपयोगी पडू शकतात. त्यामुळे आमदार निधीतून दापोली विधानसभा मतदार संघासाठी पन्नास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.