रत्नागिरी -बोलेरो पिकअप व दुचाकी याची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन वर्षीय चिमुरडीसह वडिलांचा मृत्यू झाला. शुक्रवारी खेडाशि मार्गावर हा अपघात झाला. सागर आनंद सुर्वे (वय ३५) आणि सान्वी सागर सुर्वे (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. मृत सागर सुर्वे हे निवळी कोकजे वठार गावचे शिवसेना शाखा प्रमुख होते.
सागर सुर्वे यांच्या दुचाकीला रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअपने समोरून धडक दिली. या अपघातात सागर सुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची तीन वर्षाची मुलगी सान्वी ही गंभीर जखमी झाली. यावेळी हातखंबा येथे निघालेल्या ऋषिकेश चंद्रकांत शितप या प्रवाश्याने सान्वीला तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.