रत्नागिरी -मान्सून सध्या कोकणात सक्रीय झाला आहे. गेल्या चार दिवसांत कोकणात पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच पाऊस दमदार बरसत असल्याने शेतीकामांना वेग आला आहे.
कोकणात चार दिवसांपासून मान्सूनचा दमदार पाऊस, शेतीकामांना वेग - कोकण पाऊस
कोकणात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतात नांगरणीच्या कामांना वेगानं सुरुवात झाली आहे. कोकणातली शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या वेळापत्रकानुसार, शेतीच्या कामांचे नियोजन करावे लागते. जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. कोकणात मान्सूनपूर्व पावसाच्या सरींवर भाताची पेरणी केली जाते, तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडल्यावर पेरण्या केल्या जातात.
![कोकणात चार दिवसांपासून मान्सूनचा दमदार पाऊस, शेतीकामांना वेग heavy rain in konkan ratnagiri rain news ratnagiri latest news ratnagiri farm news रत्नागिरी पाऊस बातमी रत्नागिरी शेतीविषयक बातमी कोकण पाऊस रत्नागिरी लेटेस्ट न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7652869-176-7652869-1592386125257.jpg)
कोकणात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतात नांगरणीच्या कामांना वेगानं सुरुवात झाली आहे. कोकणातली शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या वेळापत्रकानुसार, शेतीच्या कामांचे नियोजन करावे लागते. जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. कोकणात मान्सूनपूर्व पावसाच्या सरींवर भाताची पेरणी केली जाते, तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडल्यावर पेरण्या केल्या जातात. पण पावसाने चांगली साथ दिल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत, तर काही ठिकाणी पेरलेलं धान्य उगवण्यास सुरुवातही झालीय. त्यामुळे बळीराजा आता शेतीच्या इतर कामांमध्ये मग्न झाला आहे. लावणी करण्याअगोदर शेतीची उखळ केली जाते, म्हणजे संपूर्ण शेत नांगरल जातं. काही ठिकाणी याला शेतीची फोड करणं असंही म्हटलं जातं, तर दुसरीकडे शेतात उगवलेले अनावश्यक तण काढण्यासाठी महिलाही शेतात दिसू लागल्या आहेत. सध्या पावसाने चांगली साथ दिल्याने शेतीच्या या कामांना वेग आला आहे. शेतीत यांत्रिकीकरण जरी झालं असलं, तरी आजही पारंपारीक पद्धतीनं कोकणात अनेक ठिकाणी शेती केली जाते.