महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत; शेतजमिनीला पडल्या भेगा - ratnagiri no rain

पावसाच्या आश्वासक सुरुवातीमुळे शेतीच्या कामांना वेग आला होता. भात लावणीच्या कामाला देखील सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. लावणी करण्यासाठी काढलेली रोपे पाण्याअभावी रखरखत्या उन्हात सुकू लागली आहेत.

farmers-worried-over-lack-of-rain-in-ratnagiri
रत्नागिरीत पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत

By

Published : Jun 27, 2020, 4:38 PM IST

रत्नागिरी- गेले काही दिवस पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे. रत्नागिरीत आजदेखील दिवसभर पावसाने दडी मारली. शेतीच्या ऐन हंगामात पाऊस नसल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

पावसाच्या आश्वासक सुरुवातीमुळे शेतीच्या कामांना वेग आला होता. भात लावणीच्या कामाला देखील सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. लावणी करण्यासाठी काढलेली रोपे पाण्याअभावी रखरखत्या उन्हात सुकू लागली आहेत. तर लावणी केलेल्या भातशेतीच्या जमिनीमध्ये पाण्याअभावी भेगा पडू लागल्या आहेत. ऐन शेतीची लगबग सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने लावणीयोग्य बनलेली भातशेती आता पावसाच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या आठवडाभरापासून ऐन पावसात उन्हाचा रखरखाट पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतजमिनी पावसाविना कोरड्या झाल्या आहेत. उकल, बेर केलेली नांगरणी आता पुन्हा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. तीव्र उन्हामुळे नांगरलेल्या शेतजमिनी कडक बनल्या आहेत.

रत्नागिरीत पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत

ABOUT THE AUTHOR

...view details