रत्नागिरी - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा घोषांच्या वातावरणात मंगळवारी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. दिवसभरात सुमारे 10 हजार बाप्पांना निरोप देण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायांना भक्तीभावात निरोप जिल्ह्यात 1 लाख 66 हजार बाप्पांची प्रतिष्ठापना झाली
जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र बाप्पाचे आगमन उत्साहाच्या वातावरणात झाले. कोरोनाचे नियम पाळत गावागावात प्रतिष्ठापना झाली. पुजा, आरती आणि भजनांनी पहिला दिवस भक्तगणांनी साजरा केला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात 1 लाख 66 हजार बाप्पांची प्रतिष्ठापना झाली. अनेक भक्त परिस्थितीमुळे दीड दिवसांनी विसर्जन करतात. प्रथेप्रमाणे हा उत्सव साजरा होत असतो. त्यामुळे शनिवारी दुपारनंतर विसर्जनाची तयारी सुरु झाली होती. सकाळच्या सत्रात पावसाचा जोर होता. दुपारनंतर कडकडीत उन पडले आणि पावसावे विश्रांती घेतली. त्यामुळे विसर्जनाचा उत्साह अधिक होता.
रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायांना भक्तीभावात निरोप सायंकाळच्या सुमारास हलका पाऊस
रत्नागिरीतील मांडवी, भाट्ये समुद्र किनारी गणेशभक्तांनी विसर्जनासाठी गर्दी केली होती. कोरोनामुळे किनार्यावर गोंधळ उडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बहूतांश लोकांनी खासगी वाहनांमधून लाडक्या गणरायाला नेत विसर्जन केले. सायंकाळच्या सुमारास हलका पाऊस आल्यामुळे मांडवी किनारी आलेल्या गणेशभक्तांची तारांबळ उडाली. मात्र, पाऊस काही मिनिटात निघून गेला. पालिकेकडून निर्माल्य संकलनासाठी मोठे डस्टबीन ठेवण्यता आले होते. तेथे कर्मचारीही नियुक्त केला होता. जणेकरुन गणपती विजर्सनानंतर निर्माल्य पुन्हा किनार्यावर येणार नाही. याची काळजी घेण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायांना भक्तीभावात निरोप जिल्ह्याभरात कुठे किती गणरायाची प्रतिष्ठापना झाली होती
जिल्ह्यात रत्नागिरी शहर 635, ग्रामीण 114, जयगड 381, संगमेश्वर 741, संगमेश्वर 2 हजार 475, नाटे 265, लांजा 125, देवरूख 265, सावर्डे 140, चिपळूण 109, गुहागर 825, अलोरे 200, खेड 952, दापोली 1 हजार 300, मंडणगड 920, बाणकोट 215, पुर्णगड 136, दाभोळ 390 गणरायांचे विसर्जन करण्यात आले.