रत्नागिरी :राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी ( Petrol-Diesel Rates Reduced ) करण्याचा निर्णय ( State Government Decided Reduced Petrol ) घेतला. त्यानुसार पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. फामपेडाचे (फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) अध्यक्ष उदय लोध ( Phampeda President Uday Lodh ) यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत ( Welcomed Government Decision ) केले आहे. काल रत्नागिरीत याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत, ही राज्यातील जनतेच्या आणि आम्हा डिलर्सच्या दृष्टीने चांगली बातमी आहे.
फामपेडाकडून या निर्णयाचे स्वागत : राज्य सरकारकडून या घेतलेल्या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत करण्यात आले आहे. फामपेडाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध हे म्हणाले की, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्रात डिझेलचे जे दर कमी होणार आहेत, त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या बोर्डरना त्याचा फायदा होईल, तिकडून येणारे ट्रॅफिक महाराष्ट्रात डिझेल भरेल. कारण जेव्हा आपल्याकडे या राज्यांपेक्षा दर जास्त होता, तेव्हा बॉर्डरवरचा सेल या राज्यात जात ( Cell on Border Going to This State) होता. पण आता आपल्याकडे दर कमी झाल्याने महाराष्ट्रातली विक्री वाढेल, असे उदय लोध यावेळी म्हणाले. दरम्यान, आपल्या बोर्डरवरील कर्नाटक आणि गोवा हे आपल्याकडील दरापेक्षा अजूनही स्वस्त असल्याचेही लोध यावेळी म्हणाले.
नवीन सरकारचा निर्णय - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता शिंदे सरकारने महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात पेट्रोल-डीझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सामान्य नागरिकांना याचा नक्कीच दिलासा देण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांची परवड झाली असून, दिवसागणिक इंधनाच्या किमतीत अवास्तव दरवाढ सुरू आहे. पेट्रोल-डीझेलचे दर गगनाला भिडले आहेत. शिंदे सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर ६ हजार कोटींचा भार पडेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.