रत्नागिरी - कोकणातील सर्वांत मोठा श्रद्धेचा आणि परंपरेचा सण म्हणून शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. शिरगाव शिवरेवाडीत होमाची होळी केली जाते. यादरम्यान, पेटत्या होमातून नारळ काढण्याची प्रथा आजही जपली जाते.
पेटत्या होमातून नारळ काढण्याची प्रथा जपणारा शिमगोत्सव....
रत्नागिरीच्या शिरगाव शिवरेवाडीत होमाची होळी केली जाते. या होळीदरम्यान, पेटत्या होमातून नारळ काढण्याची प्रथा आजही जपली जाते. नारळ काढण्याचा हा थरार पाहण्यासाठी अनेक माहेरवाशीणी आणि चाकरमानी गावात हजेरी लावतात. पेटत्या होमातून नारळ काढणे म्हणजे जिकरीचं काम मात्र, ग्रामस्थांनी आजही ही अनोखी प्रथा कायम ठेवली असुन कोकणातल्या संस्कृतीचं जतन या सणाच्या निमीत्ताने करत आहे.
हेही वाचा - धुळवड बेतली जीवावर, नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू
कोकणात अनेक ठिकाणी सणाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्या आजही मोठ्या भक्तिभावाने जपल्या जातात. कोकणात होळी सणाला होमांची होळी ही एक वेगळी प्रथा पहायला आजही पाहायला मिळते. रत्नागिरी जवळच्या शिरगाव शिवरेवाडीत अशीच होमाची वेगळी आणि अंगावर शहारे आणणारी परंपरा येथील ग्रामस्थ जपतात. गावात पोर्णिमेच्या नंतर दुपारी होम पेटविण्यात येतो. यासाठी गावातून चिवे म्हणजे बांबूची होळी आणली जाते. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत एका शेतात ही होळी आणली जाते. होळी उभी करण्यासाठी जमिनीत कुठला खड्डा काढला जात नाही. तर गवताचे भारे आणि पालापाचोळा पसरवून होळीचा होम तयार करुन पेटवला जातो. यानतंर या पेटत्या होमात गावातील प्रत्येक घरातील एक नवसाचा म्हणुन टाकला जातो. होमचा आगडोम उठल्यानंतर खरा थरार सुरु होतो. यानतंर टाकलेले नारळ या पेटत्या होमातून काढण्याची कसरत सुरु होते. कुणी एक नारळ तर कुणी तीन नारळ या पेटत्या होमातून सहज लिलया बाहेर काढतो. पेटत्या होमाच्या दहा ते वीस फुटांपर्यत ज्वाळा उठतात, मात्र अशा परिस्थितीत होळी सणातील पेटत्या होमातून नारळ काढण्याची परंपरा आजही या गावात जोपासली जाते. नारळ काढण्याचा हा थरार पाहण्यासाठी अनेक माहेरवाशीणी आणि चाकरमानी गावात हजेरी लावत असतात. पेटत्या होमातून नारळ काढणे म्हणजे जिकरीचं काम मात्र, ग्रामस्थांनी आजही ही अनोखी प्रथा कायम ठेवली असुन कोकणातल्या संस्कृतीचं जतन या सणाच्या निमीत्ताने करत आहे.