रत्नागिरी - मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. 7 जूनपासून पेट्रोल 4 रुपये 89 पैशांनी वाढले आहे. तर, डिझेलची किंमत 4 रुपये 87 पैशांनी वाढली आहे. मात्र, सध्या किंमती वाढण्यासाठी कोणतीही परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या सध्या स्थिरच आहेत. त्यामध्ये कोणतीही वाढ नाही. सध्या क्रुड ऑईलचा दर प्रति बॅरल 36 ते 37 डॉलर इतका आहे. मात्र, अस् असतानाही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. याचा फायदा हा तेल कंपन्यांना होत असल्याचे फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती अगदी शून्यावर आल्या होत्या. त्यावेळी सरकारने कर वाढवले. मात्र, ते वाढवलेले कर आता कमी करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याने याच थेट फटका हा ग्राहकांच्या खिशाला पडतो आहे. तर, वाढीव दराचा फायदा हा तेल कंपन्या म्हणजेच पर्यायाने सरकारला होत आहे.